Archive for the ‘माझी मराठी’ Category

INTERESTING MARATHI SURNAMES

ऑगस्ट 14, 2009

“With due respect to all Marathi Ladies and Gentlemen.”

1. One who only takes – LELE

2. One with bulb factory – DIVEKAR

3. Maharashtrian Bill Gates – BAL PHATAK

4. One with weight of 100 tonnes – SOMAN

5. Neil Armstrong – NEELESH BHUJBAL

6. One with K on his head – SHIRKE

7. Bakery owner – PAWGI /BUNKAR

8. Narasimha Avtar – POTPHODE

9. One with stomach problem – POTDUKHE

10. One who lives in village – GAONKAR

11. One who only take money – DAMLE

12. One who is brave – WAGH /VEERKAR

13. One who is untidy – GABALE

14. Cotton mill owner – KAPSE /RUIKAR

15. One who eats more – DHOLE/DHAMDHERE

16. One who works very cool – KULKARNI

17.Building constructor – AADEKAR/MAHALE

18. One who is coward – PULEKAR

19. Silver mine owner – CHANDEKAR

20. One who reaches the root – MULEY

21. One who is real cat – MANJAREKAR

22. One who is 1000 times more intellegent- SAHASRABUDHHE

23. One who divides by 2 – NIMKAR

24. One who kills – MARANE

25. Do die do – KARMARKAR

26. One who twists – PILGAONKARO

27. The God – DEVO/DEO-kule

28. Big old Rishi – MAHAMUNI

29. One who always wins – JAYKAR

30. One who talks a lot – MAHASHABDE

31. One who doesn’t talk – GOOPCHOOP

32. One who builds temples – DEVALEKAR

33. One who runs away – BHAGWAT

34. One who blackens everything – KAJALE

35. One who always says ‘take away’ – NENE

36. One who is father – BAPAT

37. One with tailoring shop – SHIWDE

38. Jeweler – RATNAPARAKHI

39. One who always go to Varanasi – KASHIKAR

40. One who is very sweat – GODSE

41. Its okay – BARWE

42. Mango man – AAMBEKAR

43. One who thinks – VICHAARE

44. One who is close to everyone – JAWALKAR

45. One who is wise – SHAHANE

46. One who is bald – TAKLE

47. One who thinks of only meals – DAHIBHATHE

48. Colorful maharashtrians

- KALE

- GORE

- HIRWE

- KALBHOR

- PIWALE

- DHAWLE

49. Some Metallic Maharashtrians

- PITALE

- TAMBE

- LOKHANDE

- SONE

शिवछत्रपती

मे 3, 2009

इथे wallpaper पोस्ट करीत आहे…
जय महाराष्ट्र!!

Bhavanimata


शिवाजी महाराज


Chhatrapati Shivaji Raje


Hindvi swarajya


Me Marathi


nitin.jaysing[at]gmail.com

महाराष्ट्र दिन – गर्जतो मराठी

एप्रिल 30, 2009

१ मे. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
१९६० च्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य जन्मास आले. स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. या दिवशी द्वैभाषिक सौराष्ट्राला विभागून महाराष्ट्र(मराठी) व गुजरात(गुजराती) ही राज्ये बनवली गेली.
त्यानंतर राजा बढे यांनी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या ओळी रचल्या.
एकभाषिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी प्राण गमावले.

पूर्वार्ध
ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. १९२० रोजी नागपुरात झालेल्या कॉंग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखिल भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. कॉंग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषत: नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.

१९३८ रोजी पटवर्धन व १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे कॉंग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.

१९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकिकरण परिषदेत स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.

स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली

दार कमिशन व जे.वी.पी कमिटी
डिसेंबर १९४८ रोजी प्रसिध्द झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचेनेला विरोधदर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती.जे.वी.पी कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटकच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबईमहाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचं, उद्योगधंद्याचे शहरआहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले

फाजलअली आयोग
डिसेंबर १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करुन मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी ‘आर्थिकदृष्ट्या’ जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.

चळवळीस सुरुवात
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.महाराष्ट्रीय कॉंग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे कॉंग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्वाचे वाटतात असे म्हटले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व कॉंग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्वाचे नेते ठरले. एस.एम.जोशी, डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या ‘मराठा’ या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणा-याचा खरपूस समाचार घेतला. शाहिर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

२० नोव्हेंबर १९५५ मोरारजी देसाई व स.का.पाटील या कॉंग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी ‘पाच हजार वर्षांनी सुध्दा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी ‘कॉंग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल’ अशी मुक्ताफळं उधळली. लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करुन निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोराफाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणा-या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले

हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर १९५५ चे हुतात्मे १) सीताराम बनाजी पवार २)जोसेफ डेव्हिड पेजारकर ३)चिमनलाल डी.सेठ ४) भास्कर नारायण ५)रामचंद्र सेवाराम ६)शंकर खोटे ७)मीनाक्ष मोरेश्वर ८)धर्माजी नागवेकर ९)चंद्रकांत लक्ष्मण १०)के.जे.झेवियर ११)पी.एस.जॊन १२शरद जी. वाणी १३)वेदीसिंग १४)रामचंद्र भाटिया १५)गंगाराम गुणाजी

मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयासमोर फ्लोरा फाउंटनवर मुंबई सरकारने मिरवणुकीवर केलेल्या गोळीबारात वरील १५ जणांनी हौतात्मे पत्करले.

जानेवारी १९५६ चे हुतात्मे १६) बंडू गोखले १७)निवृत्ती विठोबा मोरे १८)आत्माराम रावजी पालवणकरण १९)बालप्पा सुनप्पा कामाठी २०)धोंडू लक्ष्मण पारडूले २१)भाऊ सखाराम कदम २२) यशवंत बाबाजी भगत २३) गोविंद बाबूराव जोगल २४) भाऊ सखाराम कदम २५) पांडुरंग धोंडु धाडवे २६)गोपाळ चिमाजी कोरडे २७) पांडुरंग बाबाजी जाधव २८) बाबू हरु काते २९) अनुप महावीर ३०) विनायक पांचाळ ३१) सीताराम गणपत म्हात्रे ३२)सुभाष भिवा बोरकर ३३)गणपत रामा तानकर ३४)सीताराम गयादीन ३५) गोरखनाथ रावजी जगताप ३६) महंमद अली ३७) तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३८) देवाजी सखाराम पाटील ३९) शामलाल जेठानंद ४०) सदाशिव महादेव भोसले ४१) भिकाजी पांडुरंग रंगाटे ४२) बासुदेव सूर्याजी मांजरेकर ४३) भिकाजी बाबू बाबरकर ४४)सखाराम श्रीपत ढमाले ४५) नरेंद्र प्रधान ४६) शंकर गोपाळ कुष्टे ४७)दत्ताराम कृष्णा सावंत ४८)बबन बापू बरगुडे ४९) विष्णु सखाराम बने ५०)सीताराम धोंडु राडे ५१) तुकाराम धोंडु शिंदे ५२)विठ्ठल गंगाराम मोरे ५३)रामा लखन विंदा ५४)एडवीन आमरोझ साळ्वी ५५)बाब महादू सावंत ५६)वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५७)विट्ठल दौलत साळुंके ५८)रामनाथ पांडुरंग अमृते ५९)परशुराम अंबाजी देसाई ६०)घनशाम बाबू कोलार ६१)धोंडू रामकृष्ण सुतार ६२)मुनीमजी बलदेव पांडे ६३)मारुती विठोबा मस्के ६४)भाऊ कोंडीबा भास्कर ६५)धोंडो राघो पुजारी ६६)-दयसिंग दारजेसिंग ६७) पांडू महादू अवरीरकर ६८) शंकर विठोबा राणे ६९)विजयकुमार सदाशिव बेडेकर ७०)कृष्णाजी गणू शिंदे ७१)रामचंद्र विठ्ठल चौगुले ७२)धोडु भागु जाधव ७३)रघुनाथ सखाराम बेनगुडे ७४)काशीनाथ गोविंद चिंदरकर ७५) करपैया किरमल देवेंद्र ७६)चुलाराम मुंबराज ७७)बालमोहन ७८) अनंता ७९)गंगाराम विष्णु गुरव ८०)रत्नु गोंदिवरे ८१) सय्यद कासम ८२)भिकाजी दाजी ८३)अनंत गोळतकर ८४)किसन वीरकर ८५)सुखलाल रामलाल बंसकर ८६)पांडुरंग विष्णु वाळके ८७)फुलवरु मगरु ८८)गुलाब कृष्णा खवळे ८९)बाबूराव देवदास पाटील ९०) लक्ष्मण नरहरी थोरात ९१)ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९२) गणपत रामा भुते ९३)मुनशी वझीर अली ९४)दौलतराम मथुरादास ९५) विठ्ठ्ल नारायण चव्हाण ९६) सीताराम घाडीगावकर ९७) अनोळखी ९८)अनोळखी बेळगाव ९९) मारुती बेन्नाळकर १००)मधुकर बापू वांदेकर १०१)लक्ष्मण गोविंद गावडे १०२) महादेव बारीगडी १०३)सौ. कमळाबाई मोरे ( निपाणी) १०४) व १०५) नावे मिळत नाही

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
१ नोव्हेंबर १९५६ ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतू बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतू या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. १९५७च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. कॉंग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणा-या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गांधींनी यांनी नेहरुंचे मन वळवले. द्विभाषिकची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याला गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं ‘व्याज’ म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरुंना राज्याला हव असलेले ‘मुंबई’ नाव वगळून समितीने ‘महाराष्ट्र’असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्रस्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

ब्लॉगला ५५५५ भेटी

एप्रिल 27, 2009

Shivaji Raje

My blog got 5555 visits,
The Marathi virtual keyboard software developed by me is downloaded by nearly 1000 peoples,
More than 500 people got kundli from me,
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी आपणां सर्वांचा आभारी आहे ,
i’m thinking about migrating this blog to new “.com” domain, i haven’t yet buyed the domain name, so keep enjoying stay on WORDPRESS.COM!

thanks & regards,
Nitin Sawant

गुदगुल्या – मराठी विनोद

एप्रिल 23, 2009

न्युटनची बायको: मी कशी दिसते?
न्युटन: तु (tan c/sin c) दिसतेस
बायकोः काय?
न्युटन: (tan c/sin c)=(sin c/cos c)/sinc = sec c..

———————-

एकदा एक रिक्षावाला No Entry मधे घुसतो तरी पोलीस त्याला अडवत नाहीत, का??
उत्तरः कारण तो चालत जात असतो.

———————-

जर २५ रु. ला पाव भाजी मिळेल तर १०० रु. ला काय मिळेल??
.
.
.
.
.
फुल भाजी!!

———————-

भुगोलाचे शिक्षकः सांगा पाहु महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?
बंड्या: जमिनीवर!!

———————-

प्रियकर प्रेयसीला म्हणतो “ते! ते बघ झाड!”
आणि मग..
मग काय..
.
.
.
प्रेयसी झाडू लागली…

———————-

कस्टमरः काय हो तुमच्याकडे मारुतीचे स्पेअर पार्टस मिळतात का?
दुकानदारः हो!
कस्टमरः मग मला एक गदा द्या.

———————-

नेपोलीयनः माझ्या डिक्शनरीत “Impossible” हा शब्दच नाही!
बंड्या: ते आधी डिक्शनरीत घेताना बघायला पाहीजे होते!!

———————-
तुमच्याकडे काही विनोद असतील तर इथे reply मध्ये पोस्ट करा.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!

एप्रिल 4, 2009

It seems that “Me Shivajiraje bhosale boltoy” is a nice movie. I’m going to watch it. या मुव्ही मधील गाणीही छान आहेत.

If you want to listen the songs from the movie “Me shivajiraje bhosale boltoy” then you are at the right place.

  1. O Raje by Sukhivindhar singh
  2. Masolevani Tuzi ga by AJIT PARAB
  3. Maharajachi kirti Befam by Nandesh Umap
  4. Maharashtra Geet by AJIT PARAB

If you want to watch the trailer of the movie then Click here

Film Review on Maharashtra Times

Very Nice Marathi Poem

फेब्रुवारी 25, 2009

Very Nice Marathi Poem

Posted by Shrikrishna Samant from California

दातांची व्यथा

पप्पा

Computer Science Journal

फेब्रुवारी 2, 2009


PhotoCopy of Journal by Chandan

PhotoSnap of HTML Practicals Journal by Chandan (TYCS 2008-09 Patkar College)

Actually, As we are the BSc Computer Science Students,
we have to write all the Computer Science practicals in the Journal which are tought in Class,

Today i came to know that Tomorrow we have to submit the HTML journal,
बाप रे!! i felt shocked when i heard that “we have to write 90 pages of HTML practicals in just one day!!”,

From Last year’s student’s journal we supposed to write the practicals,
And we(24 frendz) were having just one copy of Last year’s student’s journal,

One of my friend got an Idea!!
He took the photograph of all the 90 pages of the journal by using his Nokia N-series phone
and said “Use the PhotoCopy and write to your journal from it!!”,

wow!! it was really a great idea! Chandan, you are really great, I appreciate your work!
(मी असा स्वप्नातही विचार केला नव्हता.)

I have very limited friends but each of them is very special and unique in the whole world!!

Marathi Keyboard Software 3.0 (Full) – C# .NET

जानेवारी 29, 2009

Marathi keyboard software

नमस्कार,

मी एक असे Software बनवले आहे की ज्यामुळे तुम्ही मराठीत टायपींग करु शकता, तेही कोणत्याही इंग्रजी वेबसाइटवर. या Software द्वारे तुम्ही मराठीत Blog Post लिहु शकता, Comment लिहु शकता, तुमच्या Computer मधील Folders मराठीत Rename करू शकता,

तर मग वाट कशाची बघताय, लगेच डाऊनलोड करा.

Download: Marathi Keyboard.zip

=================================================

Hi Frendz,
I’ve finally finished writing code for software called “Marathi Keyboard”,
many new features are added in the new version 3.0,
I used C# .NET 2.0 for creating this software.

Download_Now: Nitin’s Marathi Keyboard

=================================================

Features:

  • Make blog post in Marathi
  • Rename Folder in Marathi
  • On Screen Marathi keyboard
  • Writing in Marathi in any Application without installing any marathi font
  • Press Ctrl+M to enable-disable Marathi
  • Personalized Themes support- Office 2007, Windows XP, Windows Vista, Mac OS
  • Runs From System Tray
  • To rename a folder/file, press F2 and write the desired name
  • This software is free for use but not Open source, if you want to buy the software or get the source code in just $50 then e-mail me: nitin.jaysing[at]gmail.com

=================================================

This software works with

  • Windows 2000
  • Windows XP
  • Windows Vista
  • Windows 7

=================================================

Software Requirements:
1. .NET framework 2.0 (Help)
2. Indic script (Help)

=================================================

Special thanx to Richard sir from NIIT Malad.

=================================================

मोबाइल सेवेची नवी झेप

जानेवारी 11, 2009

मोबाईल फोनसेवेच्या थ्रीजी म्हणजे ‘थर्ड जनरेशन’चे उद्घाटन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अलीकडेच दिल्लीत केले. आता देशभर या नव्या जनरेशनचा प्रसार होण्यासाठी त्याच्या स्पेक्ट्रमचा लिलाव याच महिन्यात होत आहे. या नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेताना स्पेक्ट्रम म्हणजे काय हे समजायला सोपे जावे म्हणून ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम युसेज’ चा एक तक्ताही या लेखासोबत दिला आहे.
……….
मोबाइल फोन बघता बघता इतके लोकप्रिय झाले की कित्येक घरांमध्ये प्रत्येक व्यक्तीजवळ तिचा स्वत:चा मोबाइल फोन असतो. त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्यांचे लँडलाईन फोन परत केलेत. मोबाइल फोन हा आता केवळ फोन उरलेला नाही. त्यातून एसएमएस करून महत्त्वाच्या निरोपांची देवघेव होऊ शकते. मोबाइलवरून तुम्ही इंटरनेटशी जोडले जाऊ शकता. तुमच्या आवडत्या गाण्यांचा संग्रह तुमच्या मोबाइल फोनमध्ये करता येतो. मोबाइल फोनच्या कॅमेऱ्यातून तुम्ही चांगले फोटो घेऊ शकता. आणि ते तुमच्या मित्रांना वगैरे पाठवू शकता. थोडक्यात, सर्व तंत्रांचे एकत्रीकरण तुमच्या मोबाइलमध्ये होताना तुम्ही पाहता आहात. म्हणजेच ‘कॉन्व्हर्जन्स ऑफ टेक्नॉलॉजी’ची प्रक्रिया कम्प्युटर किंवा टीव्हीसेटमधून न होता ती मोबाइल फोनमध्ये घडते आहे. याची पुढची पायरी किंवा पिढी आता येत आहे. ही मोबाइल फोनची तिसरी पिढी. म्हणूनच तिला ‘थर्ड जनरेशन’ किंवा ‘थ्रीजी’ म्हणतात.

फास्ट फॉरवर्ड
१९८० च्या दशकात अमेरिकेत सेल्युलर मोबाइल फोन सुरू झाले. सेल्युलर पद्धतीत मोबाइल फोन सेवेच्या संपूर्ण क्षेत्राचे अनेक विभाग म्हणजे सेल्स (सीईएलएल सेल) पाडलेले असतात. प्रत्येक विभागात एक बेस स्टेशन असते. त्याच्याशी वायरलेसने म्हणजेच रेडिओ लहरींद्वारा त्या विभागातील त्यावेळी असलेले सर्व मोबाईल फोन जोडले जातात. यासाठी प्रत्येक बेस स्टेशनला रेडिओ लहरींचा पट्टा दिलेला असतो. शेजारी शेजारी असलेल्या बेस स्टेशनला वेगळे पट्टे दिलेले असतात. त्यामुळे त्यांचा एकमेकांना उपदव होत नाही. दूर अंतरावरची बेस स्टेशने एकाच पट्ट्यावर असतात याला रेडिओ लहरींचा फेरवापर (रियूज) म्हणतात. हा सर्व प्रकार सोबतचा तक्ता बारकाईने पाहिला तर चटकन् समजेल.

स्पेक्ट्रम म्हणजे काय?
स्पेक्ट्रमची कल्पना येण्यासाठी इंदधनुष्याचे उदाहरण समर्पक आहे. इंदधनुष्यामध्ये सात रंगांचे पट्टे आपल्याला वेगळे दिसतात. हे सातरंगांचे पट्टे म्हणजेच प्रकाशाचा स्पेक्ट्रम झाला. ता (तांबडा) ना (नारिंगी) पि (पिवळा) हि (हिरवा) नि (निळा) पा (पारवा) जा (जांभळा) अशा सात पट्ट्या असतात; असे आपण शाळेत विज्ञानात शिकतो. तांबडा म्हणजे रेड आणि जांभळा म्हणजे व्हायोलेट. तेव्हा तांबड्याच्या खाली जो अदृश्य भाग असेल त्याला ‘इन्फ्रारेड’ म्हणतात. तर जांभळ्याच्या वरच्या भागाला ‘अल्ट्रा व्हायोलेट’ म्हणतात. आपण ज्या रेडिओलहरी वापरतो त्या इन्फ्रारेडच्याही खाली असतात. रेडिओ सहा पट्ट्यांचा, लहरींचा स्पेक्ट्रम तक्त्यात दिला आहे. पटकन नजर टाकली तर आपल्या परिचयाचे रेडिओ लहरींचे पट्टे दिसतील. वरून दुसऱ्या पट्ट्यात ऑल इंडिया रेडियोच्या मध्यम लहरींवरील स्टेशनांचा पट्टा आहे. चौथ्या पट्ट्यात एकएम आणि टीव्ही स्टेशनचा वापर दिसतो. पाचव्या पट्ट्यात टीव्ही आणि सीडीएमए तसेच जीएसएम, मोबाईल सेवांचे तुकडे दिसतात. हे तुकडे ८०० ते १००० मेगाहर्टसमध्ये आहेत. त्याच्याच पुढे मोबाईल ‘३ जी’ चा तुकडा दाखवला आहे. सहाव्या पट्ट्यात मोबाईल ‘४ जी’ आणि डीटीएचचे तुकडे दिसतात.

तक्त्यातील दुसरा पट्टा सर्वांच्या परिचयाच्या ऑल इंडिया रेडिओच्या मध्यमलहरी स्टेशन्सचा आहे. ५३५ किलोहर्टस ते १६० किलोहर्टसच्या पट्ट्याची एकूण व्याप्ती १०७ किलोहर्टझ आहे. प्रत्येक स्टेशनला १० किलोहर्टझ इतकी पट्ट्याची रुंदी पुरते. यालाच बँडविडथ म्हणतात. त्यामुळे या १०७ किलोहर्टच्या रुंदीच्या पट्ट्यात १०७ स्टेशन्स काम करू शकतात. प्रत्येक स्टेशनला ठराविक जागा दिली आहे. उदाहरणार्थ, मुंबई ब हे स्टेशन ५३५ किलोहर्टसवर तर ‘मुंबई अ’ हे रेडिओ स्टेशन १०२४ किलोहर्टसवर काम करते. ही स्टेशने रात्री किंवा दिवसा कधी बंद असली तरी त्या किलोहर्टच्या पट्ट्यात दुसऱ्या स्टेशनला काम करण्याला मनाई आहे. दहा किलोहर्टस इतक्या लहान पट्टीतून फक्त ध्वनीच्या कार्यक्रमांचे प्रसारण होऊ शकते. टीव्हीच्या कार्यक्रमांसाठी खूपच मोठी म्हणजे ७ हजार किलोहर्टस (किंवा ७ मेगा हर्टझची पट्टी लागते. तक्त्यामध्ये चौथ्या आणि पाचव्या पट्टीत टीव्हीचे पट्ट्यांचे तुकडे दाखवले आहेत. चौथ्या पट्ट्यात एमएफ स्टेशन्स दाखवली आहेत. याही स्टेशन्ससाठी विशिष्ट जागा राखून ठेवलेल्या आहेत. उदा. रेड एफएम ९३.५ वर तर एफएम गोल्ड १००.४ आणि एफएम रेनबो १०७.१ वर लागते. आपल्याला जे स्टेशन ऐकायचे असेल त्या स्टेशनच्या फ्रिक्वेन्सीवर एफएम रेडिओ ट्यून करावा लागतो.

भारतात सेल्युलर मोबाइल सेवा सुरू झाली तेव्हा यूरपमध्ये जीएसएम (ग्लोबल सिस्टिम मोबाईल) विकसित झाली होती. त्यामुळे आपण ती पद्धती अमलात आणली. ही दुसऱ्या पिढीची म्हणजे टूजी (२ जी) सेवा होय. सेल्युलर मोबाइल सेवा ९०० मेगाहर्टसच्या बँडमध्ये सुरू करायचे ठरल्यावर तेथे अगोदर कार्यरत असलेल्या संरक्षण खात्याच्या सेवांना तेथून हलवून दुसरीकडे हलवावे लागले. संरक्षण खाते हा सर्व बँड एकाच वेळी रिकामा करू शकले नाहीत. त्यांनी जसजसे तुकडे मोकळे केले तसतसे ते मोबाइल फोन कंपन्यांना देण्यात आले. मोकळे होणारे तुकडे कोणत्या कंपनीला किती प्रमाणात द्यायचे हा वादाचा मुद्दा आहे. स्पेक्ट्रमचा वाद म्हणतात तो हाच.

सध्या आपण आपल्या मोबाईलवरून एसएमएस पाठवतो. तो इच्छित स्थळी किती वेगाने जातो? हा वेग केबीपीएस ‘किलोबीट्स पर सेकंद’मध्ये मोजतात. टूजीमध्ये हा वेग १० किलोबीट्स इतका प्रचंड आहे. थ्रीजीमध्ये हा वेग २ हजार किलोबीट्स इतका प्रचंड असेल. त्यामुळे त्याचा फायदा मल्टिमिडियाला होईल. मल्टीमीडिया म्हणजे, डेटा, ध्वनी आणि चित्र असे संदेशाचे विविध प्रकार. आपण पटकन असे म्हणतो की एक चित्र हे एक हजार शब्दांच्या बरोबरीचे असते म्हणजेच चित्राचे किंवा चलतचित्रांचे संदेश पाठवण्यासाठी सध्या १० केबीपीएसच्या वेगाने जेवढा वेळ लागेल त्याच्याहून २०० पट कमी वेळ थ्रीजीमध्ये लागेल. वृत्तसंस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्वच स्तरांतील पत्रकार व इतरांना याचा खूप फायदा होईल. दूरशिक्षण व्यवस्थेतसुद्धा आकृत्या, चित्रे, नकाशे इत्यादी साधनांचा मुबलक, वेगवान उपयोग थ्रीजी मुळे करता येईल.

थ्रीजी सेवा २००० मेगाहर्ट्झ् किंवा २ गिगाहर्ट्झ्च्या बँडमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. अर्थातच, येथेही संरक्षण खात्याने जे तुकडे उपलब्ध करून दिले आहेत, तेच वाटावे लागतील. देशाच्या निरनिराळ्या परिमंडळात (सर्कल) किंवा राज्यांमध्ये हे तुकडे वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक परिमंडळात किती कंपन्यांना काम करता येईल, याची विस्तृत माहिती भारत सरकारच्या दूरसंचार खात्याने प्रसिद्ध केली आहे. त्याप्रमाणे लिलाव करून निरनिराळ्या कंपन्यांना परवाने दिले जातील.

थ्रीजीमध्ये संदेशवहनाचा वेग प्रचंड वाढणार असला तरी तो चित्रिकरणाचे व्हिडिओ क्लिप्स तत्काळ म्हणजे रिअल टाईममध्ये पाठवण्यास पुरेसा नाही. यासाठी फोर जी म्हणजे चौथ्या जनरेशनची सेवा विकसित होत आहे. २०१२ सालापर्यंत ती प्रगत देशांमध्ये कार्यरत होईल; अशी अपेक्षा आहे. फोर जीमध्ये हा वेग १०० ते १००० ‘मेगाबिटस प्रतिसेकंद’ असेल. त्यासाठी मग आपल्याला ५ गिगाहर्ट्झ्च्या वरच्या पट्टीत जावे लागेल.
(सौजन्यः मटा.)